Video Viral
Video Viral

Viral video : थरारक घटना, वाघाच्या पाठीवर हात ठेवून सेल्फीचा प्रयत्न अन्...; पुढे काय झालं ते पाहाच

थायलंडच्या फुकेत येथील टायगर किंग्डम येथे थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Video Viral) थायलंडच्या फुकेत येथील टायगर किंग्डम येथे थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. या टायगर किंग्डम येथे वाघांना जवळून पाहता येते. त्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ काढता येतात. याठिकाणी वाघाला प्रत्यक्ष समोरासमोर पाहता येतं.

या ठिकाणचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पर्यटक वाघासोबत सेल्फी घेत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला आहे. वाघासोबत हा व्यक्ती चालताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत त्या पार्कचा कर्मचारी देखील असलेला पाहायला मिळत आहे.

यावेळी तो व्यक्ती वाघासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या बाजूला बसला असता वाघाने अचानक त्या व्यक्तीवर हल्ला केला. तो व्यक्ती जोरजोरात किंकाळतानाचा आवाज या व्हिडिओमध्ये येत आहे. हा व्हिडिओ सिद्धार्थ शुक्ला या युजरच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com