Mark Zuckerberg यांनी भारताविषयी केलेल्या वक्तव्याबाबत अखेर मेटा इंडियाच्या उपाध्यक्षांचा माफीनामा
फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी भारताची माफी मागितली आहे. झुकरबर्गने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, '2024 हे वर्ष जगासाठी अशांततेने भरले होते. कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली. 'या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली. त्यावर भारत सरकारनं या विधानाची निंदा केली होती.
मार्क झुकरबर्ग यांच्या टिप्पणीविरोधात संसदीय समितीने मेटाला समन्स बजावलं होतं. या वक्तव्यानंतर देशभरात वाद उफाळला होता. त्यानंतर अखेर आता मेटाला या प्रकरणी माफी मागावी लागली आहे. मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी माफी मागितली आहे.
काय म्हणाले शिवनाथ ठुकराल?
मार्क झुकरबर्ग यांनी केलेलं निवडणुकांबाबतच्या केलेल्या निरीक्षणाबाबत वक्तव्य केलं आहे. '2024 च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत, हे मार्क यांचं निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे, परंतु भारतासाठी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. मेटासाठी भारत हा अतिशय महत्वाचा देश असल्याचं ठुकराल यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
फेसबुकचे संस्थापक आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला होता. मार्क म्हणाले होते की, 'कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगभरातील अनेक सरकारांचा पराभव झाला. कोरोनासारख्या महामारीनंतर लोकांचा सरकारवरील आत्मविश्वास कमी झाल्याचे पराभवावरून दिसून आलं.'
मार्क झुकरबर्ग यांनी भारताविषयी केलेला दावा चुकीचा ठरला. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीएशासित भाजप सरकारला पुन्हा विजय मिळला. त्यामुळे मार्क यांच्या वक्तव्यानंतर वाद उफाळला होता. देशाचे आयटी आणि कम्युनिकेशन मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहित निषेध व्यक्त केला होता. त्यांच्या या पोस्टवर शिवनाथ ठुकराल यांनी मेटाच्या वतीने माफी मागितली आहे.
बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-