Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान?
थोडक्यात
नेपाळच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा
आता सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान?
या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या
(Sushila Karki) नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेनंतर नवे राजकीय समीकरण तयार होत आहेत. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी तीव्र आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव चर्चेत आले आहे.
सुशीला कार्की या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. त्यांना त्यांच्या प्रामाणिक प्रतिमेसाठी आणि ठाम निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाते. नेपाळच्या राजकारणात त्यांचा थेट सहभाग नसलातरी न्यायव्यवस्थेतील अनुभव आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्यावर अंतरिम पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्याबाबत चर्चा सुरू आहे.
अंतरिम पंतप्रधान होण्याबाबत विचारले असता कार्की यांनी प्रतिक्रिया दिली की, तरुण पिढीने दाखवलेला विश्वास ही त्यांच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. "नेपाळच्या हितासाठी आणि राष्ट्राच्या स्थैर्यासाठी मी कार्य करण्यास तयार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत-नेपाळ संबंधांबाबतही त्या बोलल्या. "भारत हा आपल्या शेजारी देश असून दोन्ही देशांचे संबंध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यांवर आधारलेले आहेत. या नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणार आहोत," असे सुशीला कार्की यांनी सांगितले.