Iran-Israel Conflict : इराण-इस्राइल संघर्षात येमनचा अमेरिकेला इशारा, म्हणाले, "लाल समुद्रात अमेरिकेचे जहाज दिसले तर..."
इराण आणि इस्रायलमधील तणाव सतत वाढत आहे. दरम्यान, येमेनच्या हुथी बंडखोरांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. जर अमेरिकेने इराणविरुद्ध इस्रायलला पाठिंबा दिला तर ते लाल समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकन जहाजांना लक्ष्य करतील, असे हुथी गटाचे म्हणणे आहे.
हुथी सैन्याचे प्रवक्ते याह्या सरिया यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत इराणसोबत उभे राहण्याची घोषणा केली आहे. जर अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला तर आम्ही अमेरिकन सैन्याच्या जहाजांचे नुकसान करू, असे याह्या यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे.
काल रात्री अमेरिकन सैन्याने इराणच्या तीन प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला. या यादीत फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अणुऊर्जा केंद्रांची नावे आहेत. यामध्येच ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे की जर देशात शांतता प्रस्थापित झाली नाही तर इराणला आणखी मोठ्या हल्ल्यांसाठी तयार राहावे लागेल.
त्याचप्रमाणे, इराणने या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे आणि म्हटले आहे की ते त्यांचा अणुकार्यक्रम सुरूच ठेवतील. त्यामुळे आता इराण-इस्रायल युद्धाचे काय पडसाद उमटणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेने केला होता इराणवर हल्ला
अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केला. इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक करण्यात आला. फोडों, नतांज, इस्फहान या ठिकाणांवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक हल्ला करण्यात आला. यामुळे फोडो आण्विक केद्रावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत दिली.