पतंगबाजी करू नका;फडणवीसांनी मध्यामांना फटकारलं.
काही माध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची बातमी दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरवात झाली.या प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देऊन मध्यामांना फटकारलं आहे. 'राज्यात नेतृत्व बदलाची कोणतीही शक्यता नाही.विनाकारण अशा बातम्या पसरवू नका', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
"कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नवीन मंत्रिमंडळ झालंय, त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी भाजप नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. कुठल्याही प्रकारचा संघटनात्मक बदल महाराष्ट्रात होणार नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या केवळ अफवा आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चांगलं काम करताहेत, पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे हायकमांडही त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे कृपया कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका, खोट्या बातम्या पसरवू नका. तुम्हाला बातम्या कमी पडल्या तर एखादी बातमी मी देतो", असं म्हणत फडणवीस यांनी काही माध्यमांना सुनावले.
दरम्यान, भाजप राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत.त्यांच्यासोबत राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल हे नेतेही आहेत.त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी. नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचीही भेट घेतली. त्यांनतर त्यांनी दिल्ली दौरा केला. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण, दिल्ली दौरा पूर्वनियोजित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.