Vidhansabha Election
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फढणवीस यांच्या नावाला पसंती
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पसंती. अधिकृत घोषणा आणि शपथविधी कार्यक्रम 2 डिसेंबरला अपेक्षित.
अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्री पदासाठी नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती असल्याच समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून काही दिवस उलटले होते तरी देखील मुख्यमंत्रिपदासाठी नेमका चेहरा कोण याबद्दल अनेक प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत होते मात्र या प्रश्नांना आता पुर्णविराम लागणार असं दिसून येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीसांच्या नावाला संमती असल्याच देखील समोर आलं आहे. शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 2 डिसेंबरला होण्याची देखील शक्यता आहे.