Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज भरण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट; म्हणाले...

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज भरण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट; म्हणाले...

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Published on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका होत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरणार असून सकाळी 9 वाजता संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमचा 'सेवक' पुन्हा एकदा येत आहे, तुमचे 'आशीर्वाद' घेण्यासाठी. भव्य नामांकन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा! असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com