Candidates Profile
Dhiraj Patil Tuljapur Assembly Constituency; धीरज पाटील वि. राणा जगजीत सिंह पाटील; तुळजापूरात अटीतटीचा सामना रंगणार
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात धीरज पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात अटीतटीचा सामना. काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी धीरज पाटील सज्ज.
उमेदवाराचं नाव - धीरज पाटील
मतदारसंघ - तुळजापूर
उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा
पक्षाचं नाव - काँग्रेस
समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- भाजपचे राणा जगजितसिंह पाटील
उमेदवाराची कितवी लढत - 1
मतदारसंघातील आव्हानं
तुळजापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालोकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत आमदार साहेबराव हंगरगेकर यांच्यानंतर मधुकर चव्हाण हे सलग पाच वेळा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर भाजपने ही जागा खेचून आणली होती.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स
नवखा चेहरा, कुठलेही आरोप नाहीत, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कामकाजाचा अनुभवत आहे.