election commission sharing stats of candidate register for vidhansabha elections
Vidhansabha Election
Election Commission: राज्यात आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातून आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातून आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून 29 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.