Elections commission
Elections commission

वाढीव मतदानाच्या काँग्रेसच्या आरोपबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदान व इतर वादग्रस्त मुद्द्यांसंदर्भात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदान व इतर वादग्रस्त मुद्द्यांसंदर्भात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. काँग्रेसची ही मागणी आयोगाने मान्य केली असून तसे पत्र शनिवारी काँग्रेसला पाठवण्यात आले.

काही मतदारसंघांमध्ये मतदारांची नावे गायब झाली असून काहींमध्ये मतदारांमध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये अनियमितता असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री साडेअकरा या दरम्यान मतांच्या टक्केवारीत अनपेक्षित वाढ झाली असून हे वाढीव मतदान शंकास्पद असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. या दोन मुद्द्यांवर आयोगाने सुनावणी घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चन्निथाला व महासचिव मुकुल वासनिक यांनी पत्राद्वारे केली होती. यासंदर्भात तीनही नेत्यांनी आयोगाची शुक्रवारी भेटही घेतली होती.

थोडक्यात

  • वाढीव मतदान संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप

  • काँग्रेसच्या आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल

  • निवडणूक आयोगासमोर मंगळवारी होणार सुनावणी

काही मतदारसंघांमध्ये मतदारांची नावे गायब

काहींमध्ये मतदारांमध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये अनियमितता असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री साडेअकरा या दरम्यान मतांच्या टक्केवारीत अनपेक्षित वाढ झाली असून हे वाढीव मतदान शंकास्पद असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. या दोन मुद्द्यांवर आयोगाने सुनावणी घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चन्निथाला व महासचिव मुकुल वासनिक यांनी पत्राद्वारे केली होती. यावर आता मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com