Uncategorized
Anil Deshmukh | अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. देशमुख यांच्या कुटुंबीयांची ४ कोटी २० लाख रुपयांंची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली संदर्भात आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील मालमत्तेवर टाच आणल्याचं सांगण्यात येत आहे.
ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहिले नव्हते. पण ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.