Oscars 2025: आणखी एक हिंदी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत झाला सामील; परंतू भारत नव्हे तर 'या' देशाने केली निवड

Oscars 2025: आणखी एक हिंदी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत झाला सामील; परंतू भारत नव्हे तर 'या' देशाने केली निवड

'मिसिंग लेडीज' नंतर आणखी एक हिंदी चित्रपट ऑस्कर 2025 साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

'मिसिंग लेडीज' नंतर आणखी एक हिंदी चित्रपट ऑस्कर 2025 साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. 'संतोष' असे या चित्रपटाचे नाव आहे. हिंदी चित्रपट ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की तो भारतातून प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी पाठवला जात आहे, तर तसे नाही. या चित्रपटाची यूकेने अधिकृत प्रवेश म्हणून निवड केली आहे.

'संतोष' ऑस्कर 2025 साठी यूकेची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडली गेली आहे. दोन दिवसांपूर्वीच किरण राव दिग्दर्शित 'मिसिंग लेडीज' हा हिंदी चित्रपट भारतीय फिल्म फेडरेशनने ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. आता आणखी एक हिंदी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे.

ब्रिटनच्या वतीने 2025 च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मच्या शर्यतीत 'संतोष' या चित्रपटाची या श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे . डेडलाईनच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाची निवड बाफ्टाने केली आहे. या संस्थेची नियुक्ती अमेरिकन अकादमी करते. यूकेच्या वतीने नोंदी जमा करण्यासाठी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचा प्रीमियरही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आहे. 'संतोष' हा चित्रपट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संध्या सुरी यांनी केले आहे. ब्रिटीश निर्मात्यांनीही ते बनवण्यात खूप सहकार्य केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com