गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष…; आदर्श शिंदे यांच्या आवाजातील नवं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष…; आदर्श शिंदे यांच्या आवाजातील नवं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले.

या निमित्ताने नुकतंच प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांचे गाणे रिलीज झाले आहे. श्रीगणेशा देवा श्रीगणेशा… असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्यात ढोल ताशांचा गजर … गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष… असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच बाप्पाविषयीची भाविकांची आत्मियता या भावपूर्ण गाण्यातून व्यक्त होत आहे. ‘अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. या गाण्याची प्रस्तुती केली आहे.

आदर्श शिंदे म्हणाले, ”मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाणी गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ”श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…” हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.” आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याला ओंकार घाडी यांनी शब्दबद्ध केले आहे. तर काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com