Maharashtrachi Hasya Jatra Fame Actress: कपाळावर चिरी अन् 'साऊ पेटती' म्हणतं, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या अभिनेत्रींकडून सावित्रीबाई फुलेंना मानवंदन

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actress: कपाळावर चिरी अन् 'साऊ पेटती' म्हणतं, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या अभिनेत्रींकडून सावित्रीबाई फुलेंना मानवंदन

महाराष्ट्राची हास्य जत्राच्या अभिनेत्रींकडून सावित्रीबाई फुलेंना मानवंदन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास व्हिडीओ शेअर करून स्त्री शिक्षण आणि सन्मानासाठी त्यांचे योगदान स्मरणात ठेवले.
Published by :
Prachi Nate
Published on

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील स्त्री कलाकार ईशा डे, चेतना भट, नम्रता संभेराव, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात या सहा जणींनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. त्यांनी 'साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल' ही कविता सुरुवातीला गायली आहे.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रामधील मराठी अभिनेत्रींकडून समस्त महिलांना आवाहन 

सुरुवातीला रसिका वेंगुर्लेकर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत म्हणाली की, 'नमस्कार, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. आम्ही सगळ्याजणी आज सावित्री उत्सव साजरा करत आहोत. कारण, ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो.'

पुढे ईशा डे म्हणाली की, 'गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. तुम्ही, आम्ही आणि भारतातील सगळ्या मुली आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकत आहेत…याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यावर हव्या त्या क्षेत्रात काम करु शकतात…हे ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्यांच्या जन्मदिवशी उत्सव साजरा झालाच पाहिजे.'

त्याचसोबत पुढे वनिता खरात म्हणाली की, 'हा स्त्री जागर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण, प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाची, स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी मोठा लढा दिला आहे.'

यानंतर चेतना भट म्हणाली की, 'त्यांच्या या सगळ्या कार्याची आठवण आपण उराशी कायम जपून ठेवली पाहिजे.'

पुढे नम्रता संभेराव म्हणाली, 'म्हणून प्रत्येकाने आपआपल्या उंबऱ्याबाहेर ज्ञानाची एक पणती लावली पाहिजे.'

पुढे शिवाली परब म्हणाली, 'आम्ही सगळ्यांनी आमच्या कपाळावर जी चिरी लावलीये ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आशीर्वाद आहे.'

काय आहे सोनाली कुलकर्णीची पोस्ट

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस

तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो..

तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..

तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..

तुझं लग्नं झालेलं असो / नसो..

पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो..

ही चिरी कुणाच्या नावाची नाही..

ही तुझी आहे..

तुला आत्मसन्मान शिकवणारी..

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com