Upcoming Film: आमिर खान प्रोडक्शन्सची पुढील रोमँटिक ड्रामा फिल्म ‘एक दिन’ची पहिली झलक समोर आली! टीझर उद्या होणार रिलीज
या चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून मंसूर खान, आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘जाने तू… या जाने ना’ यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांनंतर आमिर आणि मंसूर खान पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.
आमिर खान प्रोडक्शन्सने नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार आणि संस्मरणीय कथा दिल्या आहेत आणि जगभरातून प्रचंड प्रेम मिळवले आहे. हीच परंपरा पुढे नेत आता बॅनर सादर करत आहे ‘एक दिन’ एक कोमल आणि भावनिक प्रेमकथा, ज्यात अत्यंत प्रतिभावान साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट साई पल्लवीच्या बहुप्रतिक्षित बॉलिवूड पदार्पणाचीही नोंद करतो.
चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून ती एका निरागस आणि हृदयस्पर्शी प्रेमकथेची झलक देते. ‘एक दिन’च्या फर्स्ट लुकमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान ही नवी ऑन-स्क्रीन जोडी दिसत आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोघेही रस्त्यावर चालताना दिसतात, जिथे त्यांची उबदारता, आकर्षण आणि सहज केमिस्ट्री स्पष्टपणे जाणवते. पोस्टरसह दिलेली टॅगलाइन आहे — “One Love… One Chance” (एक प्रेम… एक संधी).
या पहिल्या झलकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली असून चित्रपटाचा टीझर उद्या रिलीज होणार आहे. प्रेक्षकांनी आधीच ‘महाराज’मध्ये जुनैद खानचा दमदार अभिनय पाहिला आहे. आता तो एका भावनिक प्रेमकथेत झळकणार असून त्यामुळे हा प्रोजेक्ट आणखी खास ठरतो.
जुनैदसोबत स्क्रीन शेअर करत आहे साई पल्लवी, जी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये मोठी सुरुवात करत आहे. तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. साई पल्लवी साऊथमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते आणि देशभरातील प्रेक्षकांमध्ये ती खूपच प्रिय आहे.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘एक दिन’मध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून निर्मिती आमिर खान, मंसूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. चित्रपटाची कथा स्नेहा देसाई आणि स्पंदन मिश्रा यांनी लिहिली आहे. संगीत राम संपत यांचे असून गीत इरशाद कामिल यांनी लिहिली आहेत. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
