मनोरंजन
आर्या आंबेकर अन् कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2'चं आहे खास कनेक्शन; वाचा
कंगना रनौतचा 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे.
कंगना रनौतचा 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम आर्या आंबेकर अन् कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2'चं खास कनेक्शन असल्याती माहिती समोर आली आहे.
'चंद्रमुखी 2' या सिनेमातील एक गाणं आर्या आंबेकरने गायलं आहे. याची माहिती आर्याने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन दिली आहे. 'स्वागाथांजली' या गाण्याचं हिंदी व्हर्जन आर्याने गायलं आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2' या सिनेमातील 'स्वागाथांजली या गाण्याचं हिंदी व्हर्जन गाण्याची संधी मला मिळाली आहे. वैभव जोशी दादाने या गाण्याचे बोल खूप छान पद्धतीने लिहिले आहेत. त्यामुळे आता मी फक्त कृतज्ञता व्यक्त करते. गणपती बाप्पा मोरया.माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्वांचेच आभार. असे आर्या पोस्ट शेअर करत म्हणाली.