'आभाळमाया' फेम पराग बेडेकर यांचे निधन; मनोरंजनसृष्टीवर शोककळा

'आभाळमाया' फेम पराग बेडेकर यांचे निधन; मनोरंजनसृष्टीवर शोककळा

पराग बेडेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे

मुंबई : आभाळमाया फेम अभिनेता पराग बेडेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

लेखक चंद्रशेखर गोखले यांनी पराग यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. पराग गेला? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वत:च्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाइल होती. मी त्यावरुन छेडले की छान हसायचा... हास्य तर लाजवाब होते त्याचे... कुठे गेला कुठे गेला हा शोध अचानक थांबला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पराग बेडेकर यांनी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 'यदा कदाचित', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'लाली लीला', 'पोपटपंची', 'सारे प्रवासी घडीचे' अशा दमदार नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. यांसह 'आभाळमाया', 'कुंकू', 'चारचौघी', 'एक झुंझ वादळाशी', 'ओढ लावावी जिवा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com