अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण

अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण

Published by :

बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.एनआयने हि बातमी दिली आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या मनोज बाजपेयी यांनी स्वत:च्या घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या मनोज बाजपेयी एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे माहिती आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे.

मनोज बाजपेयी हे सध्या आपल्या नव्या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. वेब सीरीज 'द फॅमिली मॅन 2'ची चाहत्यांची खूप प्रतीक्षा होती. अशा परिस्थितीत अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे, त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com