अभिनेते रवींद्र महाजनींचा धक्कादायक अवस्थेत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?

अभिनेते रवींद्र महाजनींचा धक्कादायक अवस्थेत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. राहत्या घरातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. महाजनी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला होता. गश्मीरला याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली असून तो तळेगाव दाभाडेला रवाना झाला आहे. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com