“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो”

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो”

Published by :
Published on

खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की जितक्या प्रेक्षकांच्या शिव्या जास्त, तितकी लोकप्रियता अधिक. छोट्या पडद्यावरचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारत आहे. मात्र फेसबुकवर एका युझरने ताळतंत्र सोडून कमेंट केली, आणि त्यानंतर मात्र शशांक चांगलाच चिडलेला दिसला.

एका युझर अर्वाच भाषेत शशांला ही कमेंट केली.

झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या 'पाहिले ना मी तुला' या मालिकेत शशांक समरप्रताप जहागिरदार ही भूमिका साकारत आहे. शशांकची मुख्य भूमिका असली, तरी ती नकारात्मक व्यक्तिरेखा आहे. हिरोईन मानसीला छळणारा अँटगॉनिस्ट बॉस अशी त्याची भूमिका. नायिकेला त्रास देणारी व्यक्तिरेखा असल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर मात्र शशांकचा पारा चांगलाच चढला आणि त्याने संबंधित व्यक्तीला सुनावत कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल, असा सल्ला दिला.

परंतु यूझर यावर थांबला नाही. 'एकंदरीत आपणास प्रचंड राग आलेला दिसत आहे. कलाकारांनी पण अभिनय करावा, पाट्या टाकू नयेत आणि आपण काय पात्र रंगवून समाजाला काय देणं लागत आहोत याचं भान बाळगावं. वेळ काढून बाकीच्या कमेंट्स वाचल्यास नक्की डांबर कुठे आणि कुणाच्या चेहऱ्यावर आहे, हे दिसून येईल' असं प्रत्युत्तर संबंधित व्यक्तीने दिलं.

यूझरच्या या रिप्लाय नंतर मात्र शशांकचा पारा चांगलाच चढला. 'तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल ,तुम्हीच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अभिनय सुरु करा, आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघण्याची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, गोष्टला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. ही मालिका आहे अशा शब्दात शशांकने त्याला उत्तर दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com