Actor Suyash Tilak Accident
Actor Suyash Tilak Accident

Actor Suyash Tilak Accident : अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सुयश टिळक अलीकडेच एका भीषण वाहन अपघातातून थोडक्यात बचावला.
Published by :
Team Lokshahi
Published on

( Actor Suyash Tilak Accident ) मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सुयश टिळक अलीकडेच एका भीषण वाहन अपघातातून थोडक्यात बचावला. सुयशनं ही माहिती स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली. सुयशच्या सांगण्यानुसार, अपघातानंतर त्याची गाडी पूर्णपणे बंद पडली. घटना अशा ठिकाणी घडली जिथे तातडीची मदत उपलब्ध नव्हती. अखेर सुमारे तासाभराच्या प्रतीक्षेनंतर टो ट्रक आला. ड्रायव्हरनं गाडी मुंबईत ओढत नेण्याचा सल्ला दिला. पुढील 6-7 तासांचा हा प्रवास सुयशसाठी वेगळाच अनुभव देणारा ठरला.

पोस्ट शेअर करत सुयश टिळक म्हणाला की, 'छोटासा अपघात झाला, कोणतीही दुखापत झाली नाही पण माझी गाडी अक्षरशः बंद पडली.मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाहीयाबद्दल मी कृतज्ञ आहे. पण हे अशा ठिकाणी घडले जिथे मला कोणतीही मदत मिळाली नाही.घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून मुंबईपर्यंत पोहोचणे. तासभर वाट पाहिल्यानंतर मदत आली. टो ड्रायव्हरने मला आत बसण्यास सांगितले आणि म्हणाला "तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर.'

'मदत काय? गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती. त्यानंतर मी एका शांत, एसी नसलेल्या माझ्या गाडीत बसलो होतो. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत होते, काही जण हसत होते, तर काही जण काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते. मी रागावू शकलो असतो, चिडू शकलो असतो. मात्र कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर अशी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी एक पुस्तक वाचले. संगीत ऐकले. झोप घेतली. या असामान्य हलत्या सीटवरून जग फिरताना पाहिले. मी माझा दिवस मोबाईलमध्ये चित्रित करत राहिलो आणि तो एडिट करून मिनी व्लॉग बनवला. कधीकधी, आयुष्य तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्हाला ओढून नेत असते. तुम्ही प्रवास रागात घालवू शकता... किंवा तुम्ही खिडकी उघडून, श्वास घेऊन त्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com