गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

Published by :
Team Lokshahi

अभिनेत्री 'जुई गडकरी' (Jui Gadkari) नेहमीच चर्चेत असते. पुढच पाउल, सरस्वती, बिग बॉस मराठी यासारख्या मालिकांमध्ये कामे करुन जुई गडकरीची ही घराघरांत पोहोचली. जुई गडकरी ही सोशल मीडियावर (Social media) नेहमीच सक्रीय असते. नुकंतच तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चिंता वाढवणारी आहे.
नुकतंच जुई गडकरीने तिच्या फेसबुक (Facebook) अकाउंन्टवर एक पोस्ट (Post) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या गंभीर आजारांबद्दल सांगितले आहे. तसेच तिला काय काय सहन करावे लागले, तिचा त्रास , आणि या आजाराला तिने कसे मात दिले याची माहिती दिली आहे.

ही पोस्ट तिने 8 मार्च माहिला दिन या दिवशी पोस्ट केली आणि माहिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असल्याच पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तुझ्या सकारात्मकतेला सलाम, लवकर बरी हो अशा सदिच्छा दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com