मुलगी झाली हो! अभिनेत्री स्मिता तांबेला कन्यारत्न

मुलगी झाली हो! अभिनेत्री स्मिता तांबेला कन्यारत्न

Published on

मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. स्मिता काही दिवसांपूर्वीच आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्मिताच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून ही माहित समोर येत आहे.

काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात स्मिताच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. विशेष म्हणजे तिच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे स्मिताप्रमाणेच तिच्या चाहत्यांनादेखील नव्या बाळाच्या आगमनाची ओढ लागली होती. त्यानंतर आता स्मिताने एका गोड बाळाला जन्म दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्मिताचं हे बाळ नेमकं कसं दिसतं हे पाहण्याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com