मनोरंजन
Sonalee Kulkarni : राजकीय घडामोडीबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट व्हायरल
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Sonalee Kulkarni : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच मनोरंजन क्षेत्रातून देखिल प्रतिक्रिया उमटत आहेत.
अभिनेत्री सोनीली कुलकर्णी हिने एक पोस्ट केली आहे. तीची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. राज्यातील राजकीय घडामोडीविषयी सोनालीनं सोशल मिडियावर प्रश्न विचारत “पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?” असं लिहित रिअॅक्ट बारमध्ये ‘मजाक’ असे म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे. तीची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Admin