मनोरंजन
अभिनेत्री तितीक्षा तावडे करतेय 'या' अभिनेत्याला डेट? पाहा फोटो
अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.
अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा सध्या काम करत आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहचत आहे. नुकताच तीने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाचे फोटो तीने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तितीक्षासोबत अभिनेता सिद्धार्थ बोडके दिसत आहे.
तीने हे फोटो सोशल मिडियावर शेअर करत ‘आयुष्यात सर्वाधिक प्रेम करणाऱ्या लोकांसोबत हा वाढदिवस साजरा केला’ असे लिहिले आहे. क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बाश मिठू’ या चित्रपटात तिने काम केलं आहे. तसेच सिद्धार्थ बोडकेनंसुद्धा मालिका तू अशी जवळी राहा’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटात काम केलं आहे.