‘आदर्श शिंदे’ यांचं नवं गाणं अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

‘आदर्श शिंदे’ यांचं नवं गाणं अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

'मिलीनीयर' म्हणून ओळख असणा-या 'प्रशांत नाकती'च्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे.

प्रशांतची 'पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.

सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचे वारे वाहत आहेत त्याच पार्श्वभूमीवर 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मीत 'आपलीच हवा' गाणं नुकतचं रीलीज झालं. या गाण्यात ग्रामीण भागातील निवडणूकीचं हुबेहूब दर्शन घडवलं आहे.

आपलीच हवा या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार प्रशांत नाकती आहे. तर गायक आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली सोनावणे हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात संजना पंडीत, विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, सचिन कांबळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र 'आपलीच हवा' गाण्याची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com