रामायण-कुराण सारख्या...; उच्च न्यायालयाने आदिपुरुष निर्मात्यांना फटकारले

रामायण-कुराण सारख्या...; उच्च न्यायालयाने आदिपुरुष निर्मात्यांना फटकारले

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाबाबत देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लखनऊ उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले आहे.

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाबाबत देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लखनऊ उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले आहे. तर, सेन्सॉर बोर्डावरही उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आदिपुरुषाच्या संदर्भात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयातील न्यायाधीश राजेश सिंह चौहान आणि न्यायाधीश श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. तुम्हाला पुढच्या पिढीला काय शिकवायचे आहे? असा सवाल न्यायालयाने निर्मात्यांना केला आहे.

वकिल रंजना अग्निहोत्री यांनी कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह तथ्य आणि संवादांची माहिती उच्च न्यायालयाला दिली. यावर सेन्सॉर बोर्ड काय करत आहे? सिनेमा हा समाजाचा आरसा आहे, भावी पिढीला काय शिकवायचे आहे? सेन्सॉर बोर्डाला आपली जबाबदारी कळत नाही का? अशा शब्दात सेन्सॉर बोर्डाना सुनावले आहे.

केवळ रामायणच नाही तर पवित्र कुराण, गुरु ग्रंथसाहिब आणि गीता यांसारखे इतर धार्मिक ग्रंथ, बाकीचे जे काही करतात ते करत आहेत, असेही न्यायालयाने म्हंटले आहे. चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि इतर प्रतिवादी पक्ष न्यायालयात उपस्थित नसल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी दर्शवली. अधिवक्ता रंजना अग्निहोत्री यांनी सेन्सॉर बोर्डाने उत्तर न दिल्याबद्दल आक्षेप घेतला आणि चित्रपटातील आक्षेपार्ह तथ्यांची माहिती न्यायालयाला दिली. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे.

दरम्यान, ‘आदिपुरुष’च्या रिलीजनंतर हनुमान, रावण, इंद्रजित या पात्रांच्या संवादावर आक्षेप घेण्यात आला होता. यावरुन प्रेक्षकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. तेव्हा निर्मात्यांनी संवाद बदलण्याचा निर्णय घेतला. आता चित्रपटाचे संवाद बदलले आहेत, पण त्याचा विशेष फायदा चित्रपटाला होताना दिसत नाही. या चित्रपटात प्रभाससोबत क्रिती सेन, सैफ अली खान आणि सनी सिंग यांनी काम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com