'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारनंतर अशोक सराफ यांना 'संगीत नाट्य अकादमी पुरस्कार' जाहीर

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारनंतर अशोक सराफ यांना 'संगीत नाट्य अकादमी पुरस्कार' जाहीर

संगीत नाटक अकादमीचा नाटक विभागातील अभिनयासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

संगीत नाटक अकादमीचा नाटक विभागातील अभिनयासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. नुकतंच अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यापाठोपाठ त्यांना आणखी एक बहुमान मिळत आहे. 'संगीत नाट्य अकादमी पुरस्कार' जाहीर झाल्याने ऊर्जा मिळाली. यापुढो अधिक वेगळं काही करावं, अशी इच्छा आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे. तसेच ऋतुजा बागवेला देखील संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऋतुजानं संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी जाणून घ्या

1. अशोक सराफ, अभिनय

2. विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक

3. कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत

4. नंदिनी परब गुजर, सुगम संगीत

5. सिद्धी उपाध्ये, अभिनय

6. महेश सातारकर, लोकनृत्य

7. प्रमिला सूर्यवंशी, लावणी

8. अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक

9. सारंग कुलकर्णी, सरोद वादक

10. नागेश आडगावकर, अभंग संगीत

11. ऋतुजा बागवे, अभिनय

12. प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला

संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. अकादमी पुरस्कार 1952 पासून प्रदान केले जात आहेत. आयत्या घरात घरोबा,नवरी मिळे नवऱ्याला,माझा पती करोडपती आणि अशी ही बनवाबनवी या अशोक सराफ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच एका लग्नाची तिसरी गोष्ट, नांदा सौख्य भरे आणि चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्ये ऋतुजानं काम केलं. तसेच तिच्या अनन्या या नाटकातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com