Shivani Rangole : सिंगापुरमध्ये शिवानी रांगोळेला भेटली अक्षराची चाहती

Shivani Rangole : सिंगापुरमध्ये शिवानी रांगोळेला भेटली अक्षराची चाहती

झी मराठीची चर्चित मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडाची' अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे, नुकतीच सिंगापुरला गेली होती आणि तिचा तिकडचा अनुभव कसा होता हे तिने व्यक्त केलंय.
Published by  :
Team Lokshahi

बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला कोणाला नाही आवडतं? प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जाता तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. झी मराठीची चर्चित मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडाची' अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे, नुकतीच सिंगापुरला गेली होती आणि तिचा तिकडचा अनुभव कसा होता हे तिने व्यक्त केलंय.

सिंगापूरला मी दोन दिवससाठी गेली होती. एक खास प्रोजेक्ट शूट करायला. बाहेरगावी शूट म्हणजे काम आणि मजा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होतात. पूर्ण दिवस 'तुला शिकवीन चांगलाच धडाच' शूटिंग करून रात्रीचं उड्डाण भरलं मुंबईहुन सिंगापूरला. मला नवीन शहरात जायची कुतुहुलता नेहमीच असते. फक्त दोन दिवस हातात होते पण माझा उत्साह आकाशात होता. जिथे जिथे शूट करत होते तिथे तर मी फिरलीच पण शूटिंग संपल्यावर ही भटकंतीसाठी माझी बॅकपॅक घेऊन मी निघायची. सिंगापूर मध्ये 'गार्डन बाय द बे' , मरिना बे सॅण्डस , मुस्तफा मार्केट आणि लिटल इंडिया ही ठिकाणं मी फिरली. 'गार्डन बाय द बे' चे अद्भुत वास्तुकला माझ्या डोळ्यासमोर अजून ताज़ी आहे.

सर्वात जास्त माझं लक्ष ज्या गोष्टींनी वेधून घेतलं ती म्हणजे तिकडच्या लोकांन मधली शिस्त. अत्यंत स्वछ आणि शिस्तबद्ध देश आहे. एक प्रसंग मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल पहाटे २:३० वाजले होते आणि आम्ही शूट संपवून आमच्या गाडीची वाट पाहत होतो तर तिथे सिग्नलवर एक माणसांनी पूर्ण एक मिनिट आपली गाडी थांबवली होती कारण तो ट्रॅफिक लाइटचा कायदा पाळत होता. पूर्ण शुकशुकाट असताना ही तो थांबला नियमाचे पालन केले ह्या गोष्टीच मला खूप कौतुक वाटलं. मला आपल्या ही देशात असं काही बघायला आवडेल.

जेवणाचं म्हणाल तर मला नवीन नवीन पदार्थाची चव घ्यायला खूप आवडते. मी तिथे निरनिराळ्या प्रकारचे वोक बाउलचा आस्वाद घेतला. मला आवडणारे साहित्य घेऊन मी वोक बाउल बनवायची आणि खायचे. एक दिवशी मी भारतीय जेवणाची चव घ्यायला ही गेली होती. असा कुठचा ही देश नसेल जिथे आपल्याला भारतीय मिळणार नाहीत आणि सिंगापूर मध्ये भटकताना माझी गाठ भेट एका पुणेकरशी झाली. काहीतरी भेट घरी घेऊन जायची म्हणून एका दुकानात शॉपिंगसाठी गेले असता हे पुणेकर भेटले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पुणेकर त्या दुकानाचे मालक होते. योगायोग असा की त्यांची आई आमचा कार्यक्रम 'तुला शिकवीन चांगलाच धडा' बघते. गप्पा गोष्टीं मध्ये कधी वेळ गेला कळलेच नाही पण ही भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती आणि ती माझ्या आठवणीत नेहमीच राहील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com