Akshay Kumar Birthday: या घटनेमुळे अक्षय कुमारची झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

Akshay Kumar Birthday: या घटनेमुळे अक्षय कुमारची झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आज 56वा वाढदिवस आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आज 56वा वाढदिवस. अभिनेता अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. अक्षयचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने आपले नाव बदलून अक्षय ठेवले. अक्षयचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाल्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. अक्षयला लहानपणापासूनच कराटे शिकण्याची आवड होती. त्याने आठवीपासून मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली होती. मेहनतीच्या जोरावर त्याने ‘ब्लॅकबेल्ट’ देखील पटकावला.

यानंतर तो मार्शल आर्टचे पुढील शिक्षण घेण्यासाठी बँकॉकला गेला. तिथेही त्याने मार्शल आर्टचा अभ्यास सुरू ठेवला आणि थायलंडमधील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान तो एका हॉटेलमध्ये वेटरचं काम देखील करत होता. तर, फावल्या वेळात मुलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील देत होता. यातील एका मुलाने अक्षय कुमारला गंमतीत मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. अक्षयने देखील यावर विचार केला आणि स्वतःचे फोटोशूट करून घेतले. या कामासाठी त्याला एकरकमी पाच हजार रुपये मिळाले. थोड्यावेळाच्या कामासाठी इतके पैसे मिळाले, हे बघून त्यालाही आनंद झाला होता. यानंतर त्याला नॅशनल जिओग्राफिकवर प्रसारित होणार्‍या मार्शल आर्ट्सवर आधारित 'सेव्हन डेडली' या माहितीपटात काम करण्याची संधी मिळाली.

हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा चित्रपटातील एक डायलॉग खूप गाजला होता. तो असा होता, . 'इज्जतें, शोहरतें, उल्फतें, चाहतें, सब कुछ इस दुनिया में रहता नहीं, आज मैं हूं जहां, कल कोई और था, ये भी एक दौर है, वो भी एक दौर था'... हा डायलॉग त्याचा जावई अक्षय कुमारच्या आयुष्यालाही फिट बसतो. प्रत्येकाची एक वेळ असते आणि ती सतत बदलत असते. हा बदल प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे.अक्षय कुमार ९ सप्टेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. दरम्यान, त्याचा नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला असल्याचे दिसत आहे. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त टीव्ही भारत वाचकांना अक्षय कुमारच्या वैयक्तिक आणि चित्रपट जीवनाविषयी काही खास गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

अभिनेता म्हणून अक्षय कुमारचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट 'सौगंध' होता, जो 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापूर्वी अक्षय कुमार दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांच्या ‘आज’ या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसला होता. मात्र, अक्षयचा 'सौगंध' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवू शकला नाही. मात्र, 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडी’ चित्रपटाच्या यशाने अक्षयला प्रेक्षकांच्या मनात एका विशेष जागा मिळवून दिली. याच चित्रपटानंतर अक्षय कुमारला ‘खिलाडी’ हे नाव पडले. या यशानंतर अक्षयने कधीच मागे वळून पाहिले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com