Welcome to the Jungle teaser : अक्षय कुमारनं वाढदिवसानिमित्त दिली खास भेट; 'वेलकम टू द जंगल'चा टीझर प्रदर्शित...

Welcome to the Jungle teaser : अक्षय कुमारनं वाढदिवसानिमित्त दिली खास भेट; 'वेलकम टू द जंगल'चा टीझर प्रदर्शित...

अक्षय कुमारनं स्वतःला आणि चाहत्यांना दिली वाढदिवसानिमित्त खास भेट; 'वेलकम टू द जंगल'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

Welcome to the Jungle teaser: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं सेलिब्रिटींसह चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. अक्षय कुमारनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मेजवानी दिली आहे. त्यानं त्याच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल (वेलकम ३) चा मजेदार टीझर प्रदर्शित केला आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेट आणि स्टार कास्टही समोर आली आहे. 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा पार्ट 'वेलकम टू द जंगल' आहे. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४' ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. 'वेलकम टू द जंगल मध्ये अनेक कलाकार असणार आहेत.

अक्षय कुमारने 'वेलकम टू द जंगल'चा टीझर केला रिलीज: 'वेलकम टू द जंगल'च्या टीझरबद्दल सांगायचं तर हा टिझर खूप खास दिसत आहे. टीझरची सुरुवात ही जंगलापासून होते. या टिझरमध्ये चित्रपटामधील संपूर्ण स्टार कास्ट सैनिकांचा ड्रेस परिधान करून 'वेलकम ३'चं शीर्षक गीत गाताना दिसत आहेत.

चित्रपटाच्या टिझरमध्ये दिशा पटानी आणि अक्षय कुमार यांच्यात भांडण होताना दाखवलं आहे. या भांडणात रवीना टंडन ही हस्तक्षेप करताना दिसत आहे. या चित्रपटाची कहाणी काय असणार हे सध्या समजलं नाही, मात्र या चित्रपटात प्रचंड कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'वेलकम 3 ' चे अधिकृत शीर्षक 'वेलकम टू द जंगल आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, कि शारदा यांसारख्या दिग्गजांचा अभिनय या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर रवीना टंडनच्या चाहत्यांनाही बऱ्याच दिवसांनी तिला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रवीना आणि अक्षय बऱ्याच काळानंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

अक्षय कुमार-रवीना टंडन बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसणार आहेत

'वेलकम 3' चे अधिकृत शीर्षक 'वेलकम टू द जंगल' आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांसारख्या दिग्गजांचा अभिनय या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर रवीना टंडनच्या चाहत्यांनाही बऱ्याच दिवसांनी तिला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रवीना आणि अक्षय बऱ्याच काळानंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाबरोबरच अक्षयचा 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 6 ऑक्टोबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा दिवंगत जसवंत सिंह गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com