अली असगरने का सोडला होता ‘द कपिल शर्मा शो’?

अली असगरने का सोडला होता ‘द कपिल शर्मा शो’?

Published by :
Team Lokshahi
Published on

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या शो कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh) हे सर्व त्यांच्या विनोदी कलेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतल आहेत. तसेच अभिनेता अली असगर (Ali Asgar) देखील या कार्यक्रमाचा हिस्सा होता. पण त्याने हा शो (show) सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याने एका मुलाखतीमध्ये द कपिल शर्मा शो सोडण्यामागचे कारण सांगितले.

एका मुलाखतीमध्ये अली असगर म्हणाला की, 'ही खूप वाईट परिस्थिती असते जेव्हा आपल्या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागते. मी आज पण त्या शोच्या स्टेजला मिस करतो. आम्ही एक टीमप्रमाणे काम केले, पण एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की मला हा शो सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. शोमध्ये मला माझ्या कामामध्ये कोणतीही प्रगती करायला मिळत नव्हती. ' क्रिएट‍िव डिफरेंसमुळे (Creative Difference) मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com