राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लग्नातील साडी नेसून पोहोचली आलिया भट्ट

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लग्नातील साडी नेसून पोहोचली आलिया भट्ट

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे स्टार्स दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यापूर्वीच झाली होती.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे स्टार्स दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यापूर्वीच झाली होती. आता 17 ऑक्टोबर 2023 रोजी, विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन, दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, क्रिती सेनन ते संजय लीला भन्साळी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. यावेळी आलिया भट्टचे फोटो पाहून सगळ्यांच्याच नजरा थांबल्या आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या भव्य सोहळ्याला आलिया भट्ट खास तिच्या लग्नातील साडी नेसून पोहोचली आहे. आलिया भट्टने तिच्या लग्नात बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली ऑफ व्हाईट रंगाची सुंदर साडी नेसली होती. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात लग्नाची साडी पुन्हा एकदा नेसून अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी रणबीर कपूर सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’, ‘गंगुबाई काठीयावाडी’,‘मिमी’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘सरदार उधम’ या चित्रपटांनी बाजी मारली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com