Alia Bhatt
Alia Bhatt

Alia Bhatt 'राणी चॅटर्जी'च्या लूकसाठी अशी झाली तयार; BTS व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Published by  :
shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात या चित्रपटात आलिया भट्टने राणी चॅटर्जीची भूमिका साकारली आहे. आता मंगळवारी आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती आलियापासून राणी चॅटर्जी कशी तयार झाली हे दाखवले आहे.

या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट पहिल्यांदा मेकअपशिवाय दिसत आहे. त्यानंतर मेकअप आर्टिस्ट तिच्या चेहऱ्यावर टोनर आणि मॉइश्चरायझर वापरते. नंतर राणी चॅटर्जी डोळ्यांचा मेकअप आणि फेस पावडर लावून तयार होते. या मिनिमल मेकअपमध्ये, सुंदर कानातले, छोटी बिंदी आणि गुलाबी रंगाच्या शिफॉन साडीमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, "राणी बनण्याचा प्रवास. प्रेमकथेला इतके प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." आलिया भट्टच्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. आलिया भट्टच्या या व्हिडिओवर रणवीर सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने लिहिले, "हाय राणी, हा खूप छान लुक आहे प्रिय.

Alia Bhatt
Ginger Benefits; आले खाण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

दरम्यान करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून करणने दिग्दर्शनात खूप दिवसांनी हात आजमावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com