आलिया भट्टच्या हॉलिवूड चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज; रणबीरच्या चित्रपटाला देणार टक्कर

आलिया भट्टच्या हॉलिवूड चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज; रणबीरच्या चित्रपटाला देणार टक्कर

आपल्या दमदार अभिनयाने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकणारी आलिया भट्टने धमाकेदार हॉलिवूड एन्ट्री घेतली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकणारी आलिया भट्टने धमाकेदार हॉलिवूड एन्ट्री घेतली आहे. आलियाचा हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील आलियाचे पात्र खूपच दमदार असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसत आहे. आलियाचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु, याच दिवशी रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटही रिलीज होणार आहे. यामुळे रणबीर- आलिया पहिल्यादांच बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत.

आलिया भट्टच्या 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर उत्कंठावर्धक असून खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. आलिया, जेमी डोर्नन आणि गॅल गॅडॉट सारख्या मोठ्या हॉलिवूड स्टार्स या चित्रपटात दिसणार आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' हे शीर्षक चित्रपटातील इंटेलिजेंस युनिटचे नाव आहे. या संस्थेच्या डेटा स्टोरेजमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्ट नावाचे उपकरण आहे. हे आलिया चोरताना दिसते आहे. यानंतर त्या हार्टचा शोध सुरू होतो.

तर, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर रोमॅंण्टीक भूमिका सोडून पहिल्यांदाच व्हायलेंट व्यक्तिरेखा साकारत आहे. रणबीर आणि आलिया हे दोघेही दमदार कलाकार मानले जातात. आता 11 ऑगस्ट रोजी दोन्ही चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com