कपडे धुण्यापासून टॉयलेट साफ करण्यापर्यंत   सर्व कामे करताहेत अमिताभ बच्चन

कपडे धुण्यापासून टॉयलेट साफ करण्यापर्यंत सर्व कामे करताहेत अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूडचे बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ते घरीच क्वारंन्टाईन असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतात. त्यांनी आता एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे बिग बींनी कोविडमध्ये कोणत्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे, याबाबत सांगितले.

बिग बींच्या ब्लॉगनुसार, नवीन स्टाफला गोष्टी समजावून सांगणे कठीण जात आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना त्यांची सर्व कामे स्वत:च करावी लागतात. कोविड झाल्यानंतर मी माझी सर्व कामे स्वत: करत आहे. मी कपडे धुण्यापासून ते फरशी साफ करत आहे. टॉयलेटही मी स्वतः साफ करत आहे.

चहा आणि कॉफीही मीच बनवत आहे. या सगळ्या कामात ते फोन कॉल्सवरही सगळ्यांशी जोडलेले असतात. याशिवाय बिग बींसोबत एकही नर्स नाही. त्यामुळे त्यांना त्यांची औषधे स्वतःच घ्यावी लागत आहेत, असेही अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.

अमिताभ बच्चन कोविडमुळे नक्कीच थोडे अडचणीत आले आहेत. पण, सर्व काम करण्यात त्यांनाही मजा येत आहे. बिग बी म्हंटले की, हे खूप मजेशीर आणि आत्मसमाधान करणारा अनुभव आहे. आता ते कोणत्याही कामासाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून नाहीत. अखेरीस आपण सर्वांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे, असे बिग बींनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com