अमृता फडणवीसांसोबत डान्स करणारा रियाज आहे तरी कोण?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे 'मैने मूड बना लिया है' गाणं रिलीज झाले. हे गाणं सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्तानं चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचबरोबर गाण्यातील अमृता फडणवीस ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे.
अमृता फडणवीस यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या 'आज मै मूज बना लेया' या गाण्यावर त्यांनी रिल स्टारबरोबर ठेका धरला आहे. रियाझ अली असं या रिल स्टारचं नाव आहे. अमृता फडणवीस यांच्याबरोबरच्या डान्सचा व्हिडिओ रियाझ अलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रियाझ अलीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अमृता फडणवीस यांनी चाहत्यांना एक चॅलेंज दिलं होतं. आपल्या 'आज मै मूड बना लेया', या गाण्यावर हुकअप स्टेप करत त्याचे रिल बनवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. तसंच या गाण्याचे हॅशटॅगही वापरण्यास त्यांनी सांगितलं होतं. अमृता फडणवीसांच्या ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.
अमृता फडणवीस यांच्यासोबत रील करणारा रियाझ अली आहे तरी कोण?
Riyaj aly हा एक भारतीय रिल स्टार आहे. अवघ्या 18 व्या वर्षात त्याने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिजाझ अलीचा जन्म भूतानमध्ये झाला. पण तो पश्चिम बंगालमध्ये आला. रियाझ अलीचे इन्स्ट्राग्रावर जवळपास 24 मिलिअन फॉलोअर्स आहेत. रिल स्टारबरोबरच तो मॉडल आणि फॅशन ब्लॉगरही आहे. त्याचं नेटवर्थ जवळपास 80 लाख इतकं आहे. रियाजने त्याच्या करिअरची सुरुवात टिकटॉक व्हिडीओपासून केली. टिकटॉकवर रियाजला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईत येऊन करिअरची सुरुवात केली. त्याने टोनी कक्करसोबत काम केलं असून आतापर्यंत तो अनेक अल्बम साँग्समध्ये मुख्य भूमिकेतही दिसला आहे.