अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, 'तुला निर्मात्याबरोबर…'

अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, 'तुला निर्मात्याबरोबर…'

अंकिता लोखंडे हिने एका मुलाखती दरम्यान अत्यंत मोठा खुलासा केला.
Published by :
shweta walge
Published on

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग पहायला मिळते. अंकिता लोखंडे हिने टीव्ही मालिकांसोबत काही चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका केल्या. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या अंकिता लोखंडे हिने एका मुलाखती दरम्यान अत्यंत मोठा खुलासा केला.

अंकिता लोखंडे हिने एका मुलाखती दरम्यान अत्यंत मोठा खुलासा केला. अंकिता लोखंडे म्हणाली की, मला एका साऊथच्या चित्रपटाची आॅफर आली. त्यावेळी मी लहान होते. 18-19 वर्षांची मी स्मार्ट होते आणि कोणालाही अजिबातच घाबरत नव्हते. मला एका रूममध्ये बोलवण्यात आले आणि थेट सांगितले गेले की, तुला चित्रपटात काम करण्यासाठी थोडी तडजोड करावी लागेल. मी त्यावेळी थेट म्हटले की, सांगा कोणत्या पार्टीत मला जावे लागेल. मात्र, त्यावेळी मला थेट सांगण्यात आले की, तुला चित्रपट निर्मात्यासोबत झोपावे लागेल. हे ऐकून मी हैराण झाले.

त्यावेळी मी त्या व्यक्तीला थेट म्हटले की, तुमच्या निर्मात्याला चांगली अभिनेत्री पाहिजे नाहीये तर झोपण्यासाठी एक मुलगी हवी आहे, असे म्हणून मी तिथून निघून गेले. यानंतर माझी माफी देखील मागण्यात आली. परत परत मला त्या चित्रपटाची आॅफर देखील आली. मात्र, मी तो चित्रपट केला नाही. अंकिता लोखंडेचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले.

सध्या अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार हे जवळपास स्पष्टच आहे. अंकिता लोखंडे आपला पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार आहे. अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सर्वाधिक फिस घेणारी स्पर्धेक असल्याचे देखील सांगितले जातंय.

अंकिताने आपल्या टीव्ही मालिकेच्या करिअरची सुरूवात 2009 मध्ये केली. विशेष म्हणजे तिची ही मालिका तब्बल 2014 पर्यंत चालली. अंकिता लोखंडे हिला खरी ओळख ही पवित्र रिश्ता या मालिकेतूनच मिळालीये. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत या मालिकेत मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com