Mahadev Movie Poster Launch
Mahadev Movie Poster Launch

महाशिवरात्रीलाच 'महादेव' चित्रपटाचं पोस्टर लॉन्च, अंकुश चौधरी झळकणार मुख्य भूमिकेत

महाशिवरात्रीचा उत्सव दिमाखात साजरा होत असून 'महादेव' चित्रपटाचे पोस्टरही लॉन्च करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

महाशिवरात्रीचा उत्सव दिमाखात साजरा होत असून महादेव चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. स्वामी मोशन पिक्चर्सने हे पोस्टर सादर केलं आहे. तेजस लोखंडे दिग्दर्शित महादेव चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा संपन्न झाला. दरम्यान, दिग्गज अभिनेता अंकुश चौधरीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

अंकुश चौधरीच्या हातात डमरु असून डोळ्यांत क्रोध असल्याचं या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकुशने भगवान शंकराची कोणती भूमिका साकारली आहे, हे पाहण्याची सिनेचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरण सोहळ्याला अभिनेता अंकुश चौधरी, दिग्दर्शक तेजस लोखंडे, संगीतकार अमितराज, पंकज पडघन, निर्माते जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते. संदीप दंडवते लिखित या चित्रपटाचे संदीप बाबुराव काळे, अमेय संदेश नवलकर (शुभारंभ मोशन पिक्चर्स) उपस्थित होते.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "आजच्या शुभदिनी आम्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून अंकुशसारखा अष्टपैलू अभिनेता यात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारणार आहे. सध्या तरी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. परंतु 'महादेव'मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.''

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com