सल्या आणि बाळ्या यांच मालिका क्षेत्रात पर्दापण

सल्या आणि बाळ्या यांच मालिका क्षेत्रात पर्दापण

Published by :
Published on

मराठी चित्रपट सृष्टीतला अतिशय गाजलेला चित्रपट म्हणजे सैराट.त्यातील सगळ्याच पात्राने प्रेक्षकाच्यां मनावर राज्य केले.चित्रपटातील आर्ची ,परश्या,बाळ्या,सल्या या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.आता या चित्रपटातील सल्या आणि बाळ्या हे दोघे मालिका क्षेत्रात पदार्पण करत आहेत.अरबाज आणि तानाजी गलगुंडे 'मन झालं बाजिंद' या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'मन झालं बाजिंद' या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले.

'मन झालं बाजिंद' या मालिकेत कृष्णा आणि राया सोबत आता बाळ्या आणि साल्या देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com