अर्जून -मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा; अर्जून म्हणाला…

अर्जून -मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा; अर्जून म्हणाला…

Published by :
Published on

बाॅलीवूड मध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या जोड्या बनतात आणि तुटतात सुद्धा, त्यात काही नवल नाही! परंतू, सध्या बाॅलीवूड मधील एका जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती जोडी म्हणजे 'अर्जून कपूर व मलायका अरोरा!' या जोडीच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगल्या आहेत. यावर आता अर्जून कपूरने मौन सोडले आहे.

मागील काही दिवसांपासून अर्जून व मलायका ह्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र, अर्जून कपूरने हल्लीच पोस्ट केलेल्या फोटो खालील कॅप्शनने ह्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम दिलाय. मलायका सोबतचा फोटो शेअर करत त्याने लिहीलंय, 'अशा अफवांना इथं जागा नाही. सर्वांनी सुरक्षित राहा. सर्वांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना प्रेम.'

ह्याशिवाय मलायकाने सोशल मीडियावर 'वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नाॅर्मल गोष्ट' अश्या आशयाची एक पोस्ट शेअर केली.

ह्या पोस्टमध्ये तिने, 'वयाच्या चाळीशीत प्रेम करणं या गोष्टीला आपण नॉर्मलाइज केलं पाहिजे. ही गोष्ट नॉर्मल आहे. 30 वय झाल्यानंतर नव्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. 50 व्या वर्षी  नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आपलं आयुष्य 25 व्या वर्षी संपवणं योग्य नाही. असे विचार करणं बंद करा.' असा मजकूर लिहीला आहे.

अर्जून व मलायका नेहमी सोशल मीडियावर आपले वेगवेगळ्या लूक्स मधील फोटोज शेअर करत असतात.

ते अनेकदा त्यांनी शेअर केलेल्या रोमँटीक फोटोजमूळेही चर्चेत राहीले आहेत.

अनेकदा मीडिया व नेटकर्यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना एकत्र टिपलं आहे.

अनेकदा त्यांनी एकत्र व्हेकेशन एन्जाॅय करतानाचे फोटोजही शेअर केले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com