Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टी हादरली; कलाकारांनी व्यक्त केला शोक

Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टी हादरली; कलाकारांनी व्यक्त केला शोक

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एन. डी स्टुडिओमध्ये संपवल स्वत:चे जीवन. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेते विजय पाटकर म्हणाले की, खूप वाईट घडतंय आमच्या इंडस्ट्रीमध्ये. खूप दिग्गज माणूस होता. चांगला माणूस, दिग्दर्शक आपण गमावलाय. याचे दु:ख होते.

जेष्ठ अभिनेते महेश कोठारे म्हणाले की, नितीन देसाई आणि माझं खूप वेगळेच नातं होते. त्यांनी माझा झपाटलेला चित्रपटाचे प्रोडक्शन डिझाईन केली होती. मराठी माणसानं हिंदी चित्रपटामध्ये आपले नाव केलं होते. फार दु:खदायक बातमी आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे म्हणाल्या की, एवढ्या धडाडीचा माणूस, चांगले काम केलेला माणूस, त्यांनी खूप चांगले चित्रपट केलं. आमचाही खूप घरोबा होता. त्यांच्या स्टुडिओमध्ये कामानिमित्त अनेकदा माझं जाणं - येणं झालं. दरवेळी त्यांनी आपुलकीने मानसन्मान केला. त्यांच्या एन.डी स्टुडिओमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट बनले. त्यांच्या आयुष्यात काय असं घडलं असेल. याचं खरंच एक गूढ आहे. मला खूप वाईट वाटतंय. त्यांना मी नतमस्तक होते.

अभिनेते सुबोध भावे म्हणाले की, खूप धक्कादायक आहे. विश्वास बसत नाही आहे. स्वत: मोठी स्वप्न बघणारा आणि आपल्या मित्रांनाही सोबत घेऊन जाणारा. नितीन असं कधीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं. तो कधीच आत्महत्या करणाऱ्यातला कधीच नव्हता. अनेक संकटांना पचवून तो इथपर्यंत आला. दोन वर्षापूर्वी स्टुडिओ जळला. त्यामधून तो बाहेर आला. पुन्हा स्टुडिओ उभा केला. त्यामुऴे तो असं काही पाऊल उचलणारा नव्हता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com