Atif Aslam Video: भर स्टेजवर अतिफने लाईव्ह परफॉर्मन्स थांबवला; अन् म्हणाला..., पाहा व्हिडीओ
अतिफ अस्लम हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायक आहे. अतिफची गाणी अनेकजण आवडीने ऐकत असतात. अतिफने बॉलिवुडसाठी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.
अतिफ त्याच्या चाहत्यांच्या साक्षीने अनेक लाईव्ह शो करत असतो. अशातच अतिफच्या एका लाईव्ह शोमध्ये एक विचित्र प्रकार घडला ज्यामुळे त्याला शो मध्येच बंद करावा लागला.
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आतिफ अस्लम हा 'क्या से क्या हो गए देखते देखते' हे गाणं परफॉर्म करत होता. त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान एका चाहत्याने आतिफ अस्लमवर पैसे उधळले. आतिफ अस्लमनं परफॉर्मन्स थांबवला आणि त्या चाहत्याला स्टेजच्या जवळ येण्याची विनंती केली. त्यानंतर आतिफ हा त्या चाहत्याला म्हणतो, 'माझ्या मित्रा, हे सर्व पैसे दान कर, माझ्यावर टाकू नकोस. हा फक्त पैशाचा अपमान आहे.'
लाईव्ह कॉन्सर्टमधील आतिफ अस्लमचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आतिफ अस्लमचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
तेरे संग यारा, दिल दियां गल्लां,तेरे बिन,वो लम्हे वो बातें,पिया ओ रे पिया या आतिफ अस्लमच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आतिफ अस्लमला इन्स्टाग्रामवर 7.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. अतिफने अलीकडेच पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी 15 लाख रुपयांची दान केले आहे.