BrahmastraTeam Lokshahi
मनोरंजन
Brahmastra : अयानने गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर ब्रह्मास्त्राच्या मूळ संकल्पनेचे रहस्य केले उघड
या व्हिडिओमधून अयान मुखर्जी प्रेक्षकांना शस्त्रांमागील संकल्पना आणि भारतीय पौराणिक कथांमधील विश्वाचा पाया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 'ब्रह्मास्त्र' (Brahmāstra) चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ब्रह्मास्त्रच्या संकल्पना आणि परिसरावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. निर्मात्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या आगामी चित्रपटाची संकल्पना प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.
या व्हिडिओमधून अयान मुखर्जी प्रेक्षकांना शस्त्रांमागील संकल्पना आणि भारतीय पौराणिक कथांमधील विश्वाचा पाया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या अस्त्रामध्ये पृथ्वी, वायू, अग्नी, पाणी यासारख्या निसर्गात आढळणाऱ्या अनेक शक्ती आणि प्राण्यांच्या शक्तींचा समावेश होतो.