Baba Amte Death Anniversary: बाबा आमटे यांच्याविषयी न माहिती असलेल्या गोष्टी; जाणून घ्या

Baba Amte Death Anniversary: बाबा आमटे यांच्याविषयी न माहिती असलेल्या गोष्टी; जाणून घ्या

कुष्ठरोग्यांसाठी आपलं अवघं आयुष्य देणाऱ्या बाबा आमटे यांना एक प्रतिष्ठित समाजसेवक म्हणून नावलौकिक मिळाला आहे.
Published by :
Team Lokshahi

कुष्ठरोग्यांसाठी आपलं अवघं आयुष्य देणाऱ्या बाबा आमटे यांना एक प्रतिष्ठित समाजसेवक म्हणून नावलौकिक मिळाला आहे. त्यांनी कृष्ठरुग्णांसाठी अनेक आक्षम आणि समुदाय स्थापन केले. याशिवाय वन्यजीव संरक्षण, नर्मदा बचाव आंदोलन यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यांच्या कार्यशैलीमुळे, जीवनाचे तत्वज्ञान आणि सेवेमुळे त्यांना आधुनिक गांधी असेही संबोधले जाते. 9 फेब्रुवारी या दिवशी देश त्यांच्या योगदानाचे स्मरण करत आहे.

बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होते. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथील हिंगणघाट गावात एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील देविदास हरबाजी आमटे हे लेखपाल होते. मुरलीधर आमटे यांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या जमीनदारीत एखाद्या राजपुत्रासारखे गेले. एक काळ असा होता की कृष्ठरोग हा असाध्य रोग होता आणि त्यावर इलाजही नव्हता, अशा परिस्थितीत कृष्ठरोग हा संसर्गजन्य आजार मानला जायचा कृष्ठरोग झालेल्या रुग्णाला घरातून आणि समाजातून हाकलून दिले जात असे. अशा रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी पुढाकार घेऊन अनेक आश्रम उघडले. यापैकी महाराष्ट्रातील चंद्रपूरचे आनंदवन हे सर्वात प्रसिद्ध आहे. बाबा आमटे यांच्यात लहानपणापासून समाजसेवा हा गुण जडलेला होता. त्यांना वेगवान गाड्या चालविण्याचा आणि हॉलिवूड चित्रपट पाहण्याची आवड होती आणि इंग्रजी चित्रपटाचे उत्कृष्ट परीक्षण लिहत असे. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. यासोबतच त्यांनी एमए एलएलबीपर्यंतचे शिक्षणही घेतले आहे. आणि त्याने बरेच दिवस वकिलीही केली.

एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना, त्यांनी साधनाताईंना पाहिले आणि त्यांचे मनोमन प्रेम बसले. पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांचा तिरस्कार केला. पण साधनाताईंनाही बाबा आमटे आवडले होते म्हणून त्यांनी घरच्या विरोधाला पत्करून लग्न करण्याचे ठरविले. लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हातपाय झडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणूस पाहून ते भयंकर घाबरले. पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. परंतू त्यांनी त्या माणसाची सेवा करण्याचे ठरवले परंतू तो जगला नाही. पुढचे सहा महिने उलघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरवले आणि पत्नी साधनानेही त्यांच्या या निर्णयाला साथ दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले.

बाबा आमटे म्हणाले होते की, कृष्ठरुग्णांना खरी मदत तेव्हाच शक्य होईल, जेव्हा समाजाची मानसिक कृष्ठरोगापासून मुक्तता होईल आणि या आजाराविषयीची अनावश्यक भीती नाहीशी होईल. हा संसर्गजन्य आजार नाही हे सिद्ध करण्यासाठी बाबा आमटे यांनी स्वतः बॅसिली बॅक्टेरियाचे इंजेक्शन घेतले होते. त्यावेळी कृष्ठरोग हा सामाजिक कलंक म्हणून पाहिला जात असे. मात्र यासोबत बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com