'बेभान'साठी अनुपसिंग ठाकूरला विद्युत जामवालकडून शुभेच्छा

'बेभान'साठी अनुपसिंग ठाकूरला विद्युत जामवालकडून शुभेच्छा

दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूरच्या पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. या शिवाय अनुपसिंगनं अभिनयासह या चित्रपटात पहिल्यांदाच गायनही केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूरच्या पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. या शिवाय अनुपसिंगनं अभिनयासह या चित्रपटात पहिल्यांदाच गायनही केलं आहे. "बंदा बेभान" हे गीत अनुपसिंग ठाकूर याच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील स्टार विद्युत जामवालनं "बेभान" चित्रपटासाठी अनुपसिंग ठाकूरला शुभेच्छा दिल्या आहेत. "बेभान" हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

शशिकांत पवार प्रोडकशनच्या अंतर्गत मधुकर (अण्णा)देशपांडे रायगावकर आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येत आहेत. दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेल्या बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे.  चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी जबाबदारी निभावली आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनुपसिंग ठाकूर मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंग ठाकूरसोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

श्रीमंत पार्श्वभूमी असलेला नायक आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दोन तरुणी, त्यांच्यामुळे नायकात होणारा बदल हे "बेभान" चित्रपटाचं कथासूत्र आहे. अॅक्शन, रोमान्सचा पुरेपूर मसाला या चित्रपटात आहे. अनेक अॅक्शनपटांतून स्वतःला हिरो म्हणून सिद्ध केलेल्या विद्युत जामवालनं बेभान या चित्रपटासाठी अनुपसिंग ठाकूरला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com