प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’भोंगा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
नुकताच "भोंगा "या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. यानंतर सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगली प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. धर्मापेक्षा कोणीही मोठा नाही, अजाण पडताना माशिदिवरच्या भोंग्याच्या आवाजाबद्दल या सिनेमात तर्कवितर्क मांडण्यात आले आहेत, याच अशयाचा हा सिनेमा आहे,
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी पेलली असून अमोल कांगणे निर्माता आहे .हलाल, लेथजोशी, परफ्युम, वाजवुया बँडबाजा, बेफाम यांसारखे अनेक सामाजिकविषयावरचे चित्रपट प्रस्तुत केले आहेत.दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनीही सामाजिक विषयाचे अनेक सिनेमे हाताळले आहेत. २०१४ साली त्यांना धग या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आता भोंगा या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गड्सुरकर, अमोल कांगणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, अरुण गिते महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे काम पाहायला मिळणार आहे.