Rituraj Singh: बॉलीवूड विश्वातून मोठी बातमी, ऋतुराज सिंग यांचं निधन

Rituraj Singh: बॉलीवूड विश्वातून मोठी बातमी, ऋतुराज सिंग यांचं निधन

बॉलीवूड सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी ऋतुराज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Published on

बॉलीवूड सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी ऋतुराज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. टीव्ही व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे सिंह यांचं हृदय बंद पडल्यामुळे (कार्डियक अरेस्ट) निधन झालं. माहितीनुसार मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता.

ऋतुराज यांनी 'अपनी बात', 'ज्योती', 'हिटलर दीदी', 'शपथ', 'वॉरियर हाय', 'आहट', 'अदालत', 'दिया और बाती' अशा अनेक शोमध्ये काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका 'अनुपमा'मध्ये देखील झळकले होते. याशिवाय त्यांनी 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'सत्यमेव जयते २', 'थुनिवू', 'जर्सी', 'हम तूम और घोस्ट' या चित्रपटात काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दरम्यान, अचानक ऋतुराज सिंग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com