Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात 'अर्चना' प्रेग्नेंट? रिपोर्ट समोर

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात 'अर्चना' प्रेग्नेंट? रिपोर्ट समोर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
Published by :
shweta walge
Published on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ती या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याबरोबरच ती घरात सर्वात जास्त फी घेतलेली स्पर्धक देखील आहे. अंकिता या घरात तिचा पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती. लोकांना वाटलं की ती विकीसोबत या घरात खुप तगडी स्पर्धक बनेल मात्र दिवसेंदिवस तिचे आणि विकीचे भांडण होत आहे. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट झाली होती. आता याप्रकरणातील तिचे रिपोर्ट समोर आले आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे 'बिग बॉस 17' मधील लोकप्रिय जोडपं आहे. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात ते नेहमीच एकमेकांबाबत तक्रार करताना दिसत असतात. गेल्या काही दिवसांत अंकिताची तब्येत खालावली होती. त्यानंतर तिची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. अंकिताने स्वत: या संदर्भात खुसाला केला होता. त्यानंतर अंकिता लगेचच 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात मात्र असे काहीही होणार नाही. अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अंकिता लोखंडे सध्यातरी आई होणार नाही.

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात 'अर्चना' प्रेग्नेंट? रिपोर्ट समोर
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रतीक्षा बंगला मुलीच्या नावावर, किंमत पाहा किती

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेच्या सर्व टेस्ट झाल्या आहेत. आता अभिनेत्रीचे प्रेग्नंसी रिपोर्ट समोर आले असून ते निगेटिव्ह आहेत. अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी जिग्ना वोरा आणि रिंकू धवन यांच्यासोबत बोलताना आपल्या प्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर जिग्ना आणि रिंकू अभिनेत्रीची मजा घेताना दिसून आले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com