‘बिग बॉस’ हा लोकप्रिय शो आहे. चाहते कायम या शोला प्रतिसाद देत असतात. बिग बॉस 17’ची चर्चा रंगत आहे. नुकताच ‘बिग बॉस 17’ शोचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस 17’ शोचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान खानचा अंदाज चर्चेत आहे. सलमान खान वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ‘अब तक आपने सिर्फ बिग बॉस की आंख देखी है. अब देखेंगे बिग बॉस के तीन अवतार. दिल…दिमाग ही दिमाग…और दम…’.., तसेच बिग बॉस दाखवणार एक वेगळा रंग… ज्याला पाहून तुम्हीही व्हाल दंग असे हा व्हिडिओ शेअर करुन कॅप्शन देण्यात आले आहे.